How to grow hair on your head? - Dokyache Kes kase vadhvave -डोक्याचे केस कसे वाढवावे ?

Ticker

6/recent/ticker-posts

How to grow hair on your head? - Dokyache Kes kase vadhvave -डोक्याचे केस कसे वाढवावे ?

डोक्याचे केस कसे वाढवावे ? 

Read in English : 

सध्या डोक्यावरील केसांच्या समस्या वाढलेल्या आहेत, डोक्यावर केस भर भरून येण्या ऐवजी, केस गळू लागलेत. याला बरीच करणे आहेत. आपले रोजचे आहार पद्धती बदलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पाण्याच्या पण समस्या आहेत. स्वच्छ पाण्याचा अभाव, त्यामुळे केसा साठी असणारे आवश्यक घटक पुरेसे मिळत नाही. त्याच बरोबर केमिकल युक्त शाम्पू आणि इतर मिश्रणे यांचे अति प्रमाणात वापर हेही एक कारण आहे. त्यामुळे केसांच्या मुळांना हानी पोहचून केस गळू लागतात. 
आणखी एक कारण म्हणजे केसांना आवश्यक असणारे पोषण घटक आपल्या आहारातून मिळत नाहीत. आपल्या आहारात केसाना आवश्यक असणाऱ्या घटकांचा समावेश करावा, त्यामुळे केसाना वाढ होण्यास मदत होईल.

बाह्य काळजी आणि अंतर्गत संतुलनाशिवाय केसांची योग्य वाढ होणार नाही. जीवनशैलीतील काही बदलांचा केसांच्या आरोग्यावर नाट्यमय परिणाम होऊ शकतो:
हायड्रेटेड रहा: 
दररोज किमान २-३ लिटर स्वच्छ पाणी पिल्याने पेशींचे पुनरुत्पादन आणि विषमुक्ती होण्यास मदत होते.
तणाव कमी करा: 
कोर्टिसोलची पातळी कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा सावधगिरीने श्वास घेणे समाविष्ट करा, जे केसांच्या चक्रावर परिणाम करतात.
योग्य झोप:
विश्रांती दरम्यान केस पुन्हा निर्माण होतात. दररोज रात्री ७-९ तासांची दर्जेदार झोप घेण्याचे लक्ष्य ठेवा.

                                                                             


 

 

आता एक सोपा आणि आपल्याला परवडणारा उपाय करूया.
कडू-कारले:   
आपण आपल्या जेवणात कारल्याचा वापर भाजी बनवण्यासाठी करतो. कारले कडू असले तरी त्याचे परिणाम फार फायद्याचे ठरतात. कारल्याच्या भाजीने शरीरातील शुगर नियंत्रणात येते, तसेच ते केस वाढीसाठी सुद्धा फायदेशीर ठरते. कारल्याच्या रसाने रक्तातील अशुद्ध घटक शरीरा बाहेर फेकले जातात. असे बरेच फायदे या कारल्या मध्ये आहेत. 
                                                                           


 

आता कृती पाहूया :
कारले : एक मध्यम आकाराचे 
खाण्याचा सोडा : चमच्याचा पाव भाग,  सोडा नसेल तर इनो पावडर पण वापरू शकतो.
लिंबू :  ६ ते ७ थेंब      

कारले : एक मध्यम आकाराचे कार्ले पुरेसे आहे. त्याचा जेमतेम ४/५ चमचे रस निघेल. जास्त प्रमाणात रस प्यायल्यास उलटी होऊन ऍसिडिटी बाहेर पडेल, म्हणून  ४ ते ५ चमचे रस योग्य आहे.  

हे कारले आपल्याला खिसुन घ्यायचे आहे, किंवा तुकडे करून मिक्सर मध्ये मध्यम स्वरूपात बारीक करून घ्यायचे. जास्त बारीक स्वरूपात नसावेत. रस काढण्यास सोपे जावे अश्या पद्धतीने बारीक करून घ्या. 
आता एका बाउल मध्ये हाताने त्याचा रस काढून घ्या. 

उरलेला चोथा आपण भाजीत वापरू शकतो. वरील प्रमाण एका व्यक्ती साठी आहे. 
काढलेल्या रसात थोडेसे खाण्याचा सोडा वापरूया, हा अंदाजे चमच्यांचा पाव भागात येईल एवढा सोडा वापर करावा. त्यात लिंबाचा ६ ते ७ थेंब लिंबाचा रस टाकावा. हे मिश्रण घोळून घ्यावे.

त्यानंतर एका वाटीत हे मिश्रण घेऊन ( घट्ट असेल तर थोडेसे पाणी घालावे ), सकाळी काही न खाता ( अनुशा-पोटी )  त्याचे सेवन करावे, त्यावर एक ग्लासभर पाणी प्यावे. थोडेसे मळ-मळ लया सारखे वाटू लागेल. पाणी भरपूर प्या. एक तासभर काही खाऊ नका. 

हे मिश्रण एका तासात आपल्या शरीरात मिसळते, त्याचा परिणाम रक्ता मध्ये शोषला जाऊन, आपल्या केसांच्या मुळा पर्यंत हा रस पोहोचला जातो. 

 

निष्कर्ष :
काळे घनदाट केस वाढतात. 
केसांची टण-कता वाढते. काही दिवस हा कारल्याचा रस सेवन केल्याने आपल्याला फरक झालेला दिसून येईल.  

 

FAQ : वारंवार विचारले जाणारे प्रश्न: 

1. डोक्यावरील टक्कल कसे घालवावे ?

2. टक्कल घालवण्याचे उपाय कोणते ?

 

    




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या